- Get link
- X
- Other Apps
प्रभुरामचंद्र विद्यालय दादेगाव येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी जिंकली उपस्थितांची मने
दादेगाव (प्रतिनिधी): येथील प्रभुरामचंद्र विद्यालय दादेगाव येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अत्यंत उत्साहात आणि देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. हैदराबाद संस्थानाच्या अन्यायी राजवटीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतीला याप्रसंगी अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भाषणांतून क्रांतीचा इतिहास जिवंत: कार्यक्रमाची सुरु वात राष्ट्रध्वजाला वंदन करून व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास, सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे आणि अनंत भालेराव यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान यावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि ओजस्वी भाषणे केली. विद्यार्थ्यांच्या या भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली. मुख्याध्यापकांचे प्रबोधनपर विचार: या प्रेरणादायी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजाराम नरुटे सर हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, "मराठवाडा मुक्तीचा इतिहास हा अथांग स...

Comments
Post a Comment