Posts

Showing posts with the label Krantivarta

रेशीम उत्पादनात गेवराई तालुका जिल्ह्यात नंबर वन! 'रुई' गावासह अनेक गावांनी पारंपरिक शेती नाकारत घडवली क्रांती

Image
   गेवराई, प्रतिनिधी (गणेश सम्रथ):  निसर्गाचा लहरीपणा आणि पारंपरिक पिकांमधील वाढत्या खर्चामुळे शेतकरी त्रस्त असताना, गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्यात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सध्या तब्बल १,४४७ एकर क्षेत्रासह गेवराई तालुका बीड जिल्ह्यात रेशीम उत्पादनात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. तालुक्यातील रुई हे गाव जिल्ह्यात सर्वाधिक रेशीम उद्योग करणारे गाव ठरले आहे. या गावासोबतच आता राहेरी, नागापूर, कामखेडा, बऱ्हाणपूर, राजेवाडी आणि पुरुषोत्तमपुरी ही गावे देखील १०० एकर क्षेत्राकडे वाटचाल करत आहेत. कमी पाण्यात आणि वर्षभरात तब्बल चार वेळेस हमखास उत्पादन देणाऱ्या या शेतीमुळे गेवराईतील ऊसतोड कामगार आणि तरुण शेतकरी आता दरमहा लाखोंची कमाई करत स्वतःचे जीवनमान बदलत आहेत

मराठवाड्यात दुष्काळाचे सावट ! बीड जिल्ह्यात केवळ १६% पाणीसाठा; आष्टीत उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ

Image
            बीड: गेल्या दीड महिन्यापासून पावसाने संपूर्ण पाठ फिरवल्यामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील हाताशी आलेली सोयाबीन, कापूस आणि तूर ही पिके पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, आष्टी तालुक्यात हताश शेतकऱ्यांनी पिकांमधून काहीच उत्पन्न मिळण्याची आशा न उरल्याने उभ्या पिकांमध्ये जनावरे चरण्यासाठी सोडून दिली आहेत.सध्या जिल्ह्यातील १६४ सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ १६.३०% उपयुक्त जलसाठा शिल्लक असून, पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. माजी लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी बीड जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून शासनाने हेक्टरी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.