भविष्याचा मित्र AI | अंक २४ | AI आणि नोकरी - Interview मध्ये AI तुमचा मित्र
क्रांतीवार्ता DIGITAL NEWS PORTAL सादर करत आहे... अंक २४ | AI आणि नोकरी – Interview मध्ये AI तुमचा मित्र लेखक: किरण नागरगोजे | AI Cognitive Architect & Philosopher | अनुभव: १७+ वर्षे एक सत्य सांगतो. आज मोठ्या कंपन्यांमध्ये हजारो applications येतात. एखाद्या पदासाठी ५,००० अर्ज! कोण वाचणार हे सगळे? उत्तर: AI. AI प्रत्येक Resume स्कॅन करतो, keywords शोधतो आणि Top ५०-१०० उमेदवार निवडतो. बाकी applications माणूस कधीच बघत नाही. म्हणजे AI ने तुम्हाला reject केले – माणसाने नाही! AI आणि Resume – काय करायचे? ATS (Applicant Tracking System) – AI हे software resume वाचते Keywords महत्त्वाचे – job description मधले शब्द Resume मध्ये असावेत Format simple ठेवा – fancy design AI चुकीचे वाचतो ChatGPT ने Resume तपासून घ्या – 'माझा resume improve कर' LinkedIn optimize करा – AI recruiters शोधतात Interview मध्ये AI कशी मदत करतो? ...