दादेगाव येथे विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या भूमिपुत्रांचा ‘विशेष गुणगौरव सोहळा-२०२६’ उत्साहात संपन्न!
विशेष प्रतिनिधी: शुक्रवार, दिनांक २ ऑक्टोबर दादेगाव (ता. आष्टी, जि. बीड) येथील श्रीराम मंदिर सभागृहात दादेगाव ग्रामस्थ, कृतीशील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना शाखा आष्टी आणि क्रांतीज्योती सेवाभावी संस्था दादेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दादेगाव परिसरातील गुणवंतांचा व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भूमिपुत्रांचा ‘विशेष गुणगौरव सोहळा-२०२६’ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध माजी प्राध्यापक श्री. मुकुंद काका धनेश्वर यांनी भूषविले. या सोहळ्यात विविध राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त व्यक्ती, गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, नवनियुक्त शिक्षक, तसेच प्रामाणिकपणे मौल्यवान वस्तू परत करणाऱ्या नागरिकांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. महत्त्वाचे सत्कारमूर्ती व पुरस्कार वितरीत झालेले क्षेत्र: राष्ट्रीय / राज्यस्तरीय पुरस्कार: प्राचार्य हरिदास विधाते यांना 'आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचा राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६' तर प्राचार्य शिवदास विधाते यांना 'शिवस्वराज्य राज्यस्तरीय प्रशासन अधिकारी पुरस्कार २०२६' प्रदान ...