भविष्याचा मित्र - AI | अंक १२ | Robot आणि AI – यंत्रमानव येतोय का?
भविष्याचा मित्र - AI | अंक १२ | Robot आणि AI – यंत्रमानव येतोय का? लेखक: किरण नागरगोजे | AI Cognitive Architect & Philosopher | अनुभव: १७+ वर्षे एक दृश्य. एक robot स्वयंपाक करतो, भांडी धुतो, घर झाडतो. आईला घरकामातून सुट्टी! हे चित्रपटात दाखवतात – पण हे खरोखर शक्य होणार का? आणि कधी? Robotics आणि AI – यांचा संबंध काय? Robot म्हणजे एक यंत्र जे शरीराने काम करते. AI म्हणजे एक मेंदू जो विचार करतो. जेव्हा Robot ला AI दिला जातो, तेव्हा तो 'हुशार robot' बनतो. म्हणजेच तो स्वतः निर्णय घेऊ शकतो – 'आता काय करायचे?' जगात AI Robots काय काय करतात? Boston Dynamics चा Atlas – उड्या मारतो, पुठे उचलतो, खडकाळ जमिनीवर धावतो Tesla Optimus – घरातील कामे करणारा humanoid robot Warehouse Robots – गोदामात दिवसरात माल ठेवतात, शोधतात Surgical Robots (Da Vinci) – शस्त्रक्रियेत डॉक्टरांना मदत Drone Delivery – Swiggy, Zomato चे जेवण drone ने भारतात AI Robots DR...