Posts

Showing posts with the label गेवराई

मादळमोही परिसराच्या पाणीप्रश्नासाठी ३० ऑक्टोबरला महामार्ग रोको; पैठण ते मादळमोही २० इंची पाइपलाइनची मागणी

Image
जायकवाडी धरणातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वपक्षीय आक्रमक पवित्रा गेवराई (प्रतिनिधी): गेवराई तालुक्यातील मादळमोही व परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी 'पैठण ते मादळमोही २० इंची पाणी पाइपलाइन' मंजूर करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी महामार्ग रोको आंदोलन पुकारण्यात आले आहे. जायकवाडी धरणातून या परिसरातील सर्व गावांना नियमित पाणीपुरवठा करणारी व्यवस्था उभी राहावी, यासाठी व्यापक सर्वपक्षीय जनआंदोलन उभारण्याची तयारी वेगाने सुरू झाली आहे. मादळमोही व लगतच्या गावांना सातत्याने भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईतून कायमची मुक्ती मिळावी, नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पैठण ते मादळमोही २० इंची पाइपलाइन हाच एकमेव ठोस पर्याय असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने व संबंधित प्रशासकीय विभागाने या योजनेला तातडीने मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित यांना निवेदन या आंदोलनाची दखल घेतली...

शिरसमार्गातील नागरी समस्यांवर किशोर मगर यांचे आमरण उपोषण; ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या

Image
पिण्याचे पाणी, बंद फिल्टर, दुरवस्था झालेले रस्ते अन् स्वच्छतेच्या प्रश्नांवर प्रशासनाचे वेधले लक्ष गेवराई / प्रतिनिधी: गेवराई तालुक्यातील प्रमुख बाजारपेठेचे गाव असलेल्या शिरसमार्ग येथील तीव्र पाणीटंचाई, बंद पडलेले पाणी फिल्टर, रस्त्यांची चाळण, पथदिवे अन् आरोग्याचा गंभीर बनलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी किशोर गुलाब मगर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या मूलभूत समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी त्यांनी सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. शिरसमार्ग हे परिसरातील मोठे आणि महत्त्वाचे व्यापारी केंद्र असूनही येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्चून बसवलेले पिण्याच्या पाण्याचे फिल्टर दीर्घकाळापासून बंद अवस्थेत आहे. ते तात्काळ दुरुस्त करून नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी प्रमुख मागणी मगर यांनी केली आहे. निवेदनातील प्रमुख मागण्या व समस्या: रस्ते व पथदिवे : दलित वस्तीतील सिमेंट रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत. भिमनगर, ...

गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथे ११ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र महोत्सव व शिव महापुराण कथेचे आयोजन

Image
श्री सुभान संतुआई देवी जागृत देवस्थानचा १९ वा धार्मिक महोत्सव; २० ऑक्टोबरला दसरा महामेळावा व महाप्रसाद गेवराई (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील श्री सुभान संतुआई देवी जागृत देवस्थानच्या वतीने यंदा १९ व्या वर्षी शारदीय नवरात्र महोत्सव व शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ११ ऑक्टोबरपासून या धार्मिक महोत्सवाला प्रारंभ होणार असून, मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर दसरा मेळावा, सीमोल्लंघन व महाप्रसादाने महोत्सवाची सांगता होणार आहे. या काळात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, हरिपाठ, सप्तशती पाठ, आरती आणि हरिजागराचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी तसेच शिव महापुराण कथेचे श्रवण करण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, सिरसमार्ग व पंचक्रोशी परिसराच्या वतीने करण्यात आले आहे. दररोज धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल महोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होईल. दररोज पहाटे ४ ते ६ या वेळेत काकडा भजन, सकाळी ६ वाजता आरती, सका...