गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथे ११ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र महोत्सव व शिव महापुराण कथेचे आयोजन
श्री सुभान संतुआई देवी जागृत देवस्थानचा १९ वा धार्मिक महोत्सव; २० ऑक्टोबरला दसरा महामेळावा व महाप्रसाद
गेवराई (प्रतिनिधी)
गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील श्री सुभान संतुआई देवी जागृत देवस्थानच्या वतीने यंदा १९ व्या वर्षी शारदीय नवरात्र महोत्सव व शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ११ ऑक्टोबरपासून या धार्मिक महोत्सवाला प्रारंभ होणार असून, मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर दसरा मेळावा, सीमोल्लंघन व महाप्रसादाने महोत्सवाची सांगता होणार आहे. या काळात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, हरिपाठ, सप्तशती पाठ, आरती आणि हरिजागराचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी तसेच शिव महापुराण कथेचे श्रवण करण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, सिरसमार्ग व पंचक्रोशी परिसराच्या वतीने करण्यात आले आहे.
दररोज धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होईल. दररोज पहाटे ४ ते ६ या वेळेत काकडा भजन, सकाळी ६ वाजता आरती, सकाळी ९ ते ११ या वेळेत सप्तशती पाठ, त्यानंतर फराळ पंगत होणार आहे. दुपारी १ ते ४ या वेळेत शिव महापुराण कथेचे निरूपण केले जाईल. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत हरिपाठ, सायंकाळी ६ वाजता फराळ, रात्री ७.३० वाजता आरती, तर रात्री ९ वाजल्यापासून हरिजागर, भजन व आराधी सेवेचे कार्यक्रम होतील.
या धार्मिक उपक्रमांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, भाविकांना सामूहिक भक्ती, नामस्मरण आणि धार्मिक श्रवणाचा लाभ घेता येणार आहे.
नामवंत महाराजांच्या उपस्थितीत शिव महापुराण कथा
या महोत्सवात ह.भ.प. धुराजी महाराज कोळेकर आणि ह.भ.प. रामेश्वर महाराज चव्हाण (सुकळीकर) हे शिव महापुराण कथेचे प्रवक्ते म्हणून सेवा देणार आहेत. ह.भ.प. बबन देव महाराज जोशी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कृष्णा देवा जोशी सप्तशती पाठ करणार असून, बळीराम महाराज गिरी हे सिंथ व गायनाची सेवा देतील. संदिप महाराज नरके तबल्याची साथ करणार आहेत.
तसेच भाऊसाहेब देवा जोशी, परमेश्वर जाधव, प्रा. गोरख सर पवळ, ज्ञानेश्वर पवळ, दादासाहेब पंडीत, रामकिसन रत्नपारखे आणि अशोकराव पवार हे संगीतसाथ व सेवेत सहभागी होणार आहेत. विविध भजनी मंडळे आणि आराधी सेवा देणारे ग्रुपही दररोजच्या कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत.
पंचक्रोशीतील भाविक व सेवेकऱ्यांचा सहभाग
महोत्सवाच्या आयोजनासाठी सिरसमार्गसह काळेवाडी, टाकळगव्हाण, मानकापूर, शहाजानपूर, पारगाव, तांदळवाडी, पौहुळ, धोंडराई, तरटेवाडी, पोखरी, साठेवाडी आदी परिसरांतील भजनी मंडळे आणि गणेश मंडळे सेवा देणार आहेत.
११ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विविध भाविकांनी सकाळच्या व सायंकाळच्या फराळाची जबाबदारी स्वीकारली आहे. १९ ऑक्टोबर रोजी पांडुरंगजी लक्ष्मणराव गाडे हे सकाळच्या फराळाचे अन्नदाते असतील. याच दिवशी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत होमहवन यज्ञाला प्रारंभ होणार आहे.अन्नदान, भजनसेवा, संगीतसाथ आणि धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक एकत्र येऊन या महोत्सवात योगदान देणार आहेत.
२० ऑक्टोबरला दसरा महामेळावा व महाप्रसाद मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी महोत्सवाचा सांगता दिवस असणार आहे. सकाळी ६ वाजता आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वितरण सुरू होईल. दुपारी ४ वाजता विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर देवीभक्तांचा दसरा महामेळावा व सीमोल्लंघन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या महाप्रसादासाठी संतोष गवळी (सर), दादासाहेब राजळकर, पांडुरंग पन्हाळे (मामा), गणपत पाबळे (सर), सखाराम सम्रत,(आप्पा) बबन जेठे, सुभाष गचांडे, घाडगे परिवार आणि हाजारे परिवार (शहाजानपूर व सिरसमार्ग पंचक्रोशी) यांनी अन्नदानाची सेवा स्वीकारली आहे.
भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
श्री सुभान संतुआई देवी जागृत देवस्थानच्या या १९ व्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी मंडप व्यवस्था भैरवनाथ मंडप, खडकी यांच्या वतीने करण्यात येणार आहे. महोत्सवाचे आयोजन समस्त गावकरी मंडळी, सिरसमार्ग व पंचक्रोशी परिसर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
महोत्सवाबाबत अधिक माहिती व देणगीसाठी ह.भ.प. धुराजी महाराज कोळेकर (९५७९५३२९०६), ह.भ.प. बबन देव महाराज जोशी (९८२२०३८७५७), राजेश ओस्तवाल (९४२३७१४८१८) आणि ज्ञानेश्वर पवळ (७०२८८२८२५९) यांच्याशी संपर्क साधावा. देवीचा संपर्क क्रमांक ९५४५९३२१७७ असा आहे.
Comments
Post a Comment