Posts

Showing posts with the label Kada

प्रभुरामचंद्र विद्यालय, दादेगावच्या विद्यार्थिनींची कबड्डी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी; आष्टी तालुका क्रीडा स्पर्धेत ठरल्या उपविजेत्या!

Image
आष्टी (क्रीडा विशेष): आष्टी तालुका क्रीडा स्पर्धेत शालेय क्रीडा विभागांतर्गत आयोजित कबड्डी सामन्यांमध्ये प्रभुरामचंद्र विद्यालय, दादेगावच्या १७ वर्षाखालील वयोगटातील विद्यार्थिनींनी जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपविजेत्या पदकाचा मान मिळवला आहे. कुस्तीपटूंची खाण आणि मातीतील अस्सल मल्ल घडवणारे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'प्रभुरामचंद्र विद्यालय, दादेगाव' या शाळेच्या खेळाडूंनी कुस्तीप्रमाणेच इतर खेळांमध्येही आपली चमक दाखवून पुन्हा एकदा तालुक्यात शाळेचे नाव उंचावले आहे. अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या झालेल्या या कबड्डी स्पर्धेत विद्यार्थिनींनी सांघिक खेळाचे उत्तम कौशल्य सादर करत अंतिम फेरीत धडक मारली पिंपळेश्वर विद्यालय पिंपळा विरुद्ध झालेल्या या सामन्यात विद्यार्थिनींनी उपविजेतेपद पटकावले. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण दादेगाव व आष्टी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. खेळासोबतच जिद्द आणि कष्टाची जोड असेल तर ग्रामीण भागातील तरुणही कसे शिखरावर पोहोचू शकतात, याचे उत्तम उदाहरण या विद्यार्थिनींनी आपल्या या ...

बीड व आष्टी तालुक्यासाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय; नेकनूर व कडा येथे अप्पर तहसीलदार कार्यालये कार्यान्वित करण्यास शासनाची मान्यता

Image
कडा (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा महसुली कामांसाठी होणारा त्रास आणि वारी वाचवण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, बीड तालुक्यातील नेकनूर आणि आष्टी तालुक्यातील कडा येथे नवीन अप्पर तहसीलदार कार्यालये कार्यान्वित करण्यास अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयातील कामकाजाचा वाढता व्याप, भौगोलिक विस्तार आणि नागरिकांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रशासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे बीड व आष्टी तालुक्यातील नागरिकांना दाखले, प्रमाणपत्रे, जमिनीचे फेरफार यांसारख्या विविध महसुली सेवा आता स्थानिक पातळीवरच अगदी सहज आणि जलद उपलब्ध होणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे नेकनूर व कडा परिसरातील नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांमधून तीव्र समाधान व्यक्त होत असून, अनेक दिवसांची त्यांची मागणी पूर्ण झाली आहे. लवकरच ही नवीन कार्यालये प्रत्यक्ष सुरू होऊन कारभार सुरू होण्याची शक्यता आहे.