Posts

Showing posts with the label SCERT Pune Recruitment

शिक्षकांसाठी मोठी संधी! महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत ९२ पदांची उसनवारीने भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

Image
पुणे वृत्त: महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत येणाऱ्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र, पुणे आणि विविध प्रादेशिक विद्या प्राधिकरणांमध्ये 'विषय सहायक' पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही पदे उसनवारी (Deputation) तत्त्वावर भरली जाणार असून, यासाठी इच्छुक आणि पात्र शिक्षकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. 🛑 महत्त्वाची अट (पात्रता): ही भरती केवळ शासकीय आणि जिल्हा परिषद (Z.P.) शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या नियमित शिक्षकांसाठीच आहे. खाजगी शाळांचे (अनुदानित तसेच विनाअनुदानित दोन्ही) शिक्षक या पदांसाठी पात्र नाहीत. एकूण पदे आणि जागांचा तपशील: या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ९२ पदे भरली जाणार आहेत. याचे विभागवार वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे: • राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे: ११ पदे • प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई-९: (जागा तपशील मूळ जाहिरातीनुसार) • प्रादेशिक विद्या प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर-३: (जागा तपशील मूळ जाहिरातीनुसार) • प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर-८: (जागा तपशील मूळ जाहिरातीनुसार) • जिल्हा शिक्...