भविष्याचा मित्र - AI | अंक ८ | AI आणि शिक्षण – उद्याचे वर्ग
भविष्याचा मित्र - AI | अंक ८ | AI आणि शिक्षण – उद्याचे वर्ग लेखक: किरण नागरगोजे | AI Cognitive Architect & Philosopher | अनुभव: १७+ वर्षे एक स्वप्न पाहा. तुमच्यासाठी एक AI शिक्षक आहे. तुम्हालागणित्यात अवघड वाटणारी संकल्पना तो वेगवेगळ्या पद्धतीने समझावतो. तुम्ही चुकलात तर रागावत नाही, परत सांगतो. रात्री दोन वाजता प्रश्न विचारला तरी उत्तर देतो. हे स्वप्न आज सत्यात येत आहे – AI मुळे. AI शिक्षण क्षेत्रात काय करतो? Adaptive Learning: प्रत्येक विद्यार्थ्याच्या गतीनुसार अभ्यासक्रम बदलतो Automated Grading: निबंध, MCQ, कोड – सर्व AI तपासतो Virtual Tutors: २४×७ उपलब्ध AI शिक्षक Plagiarism Detection: copy-paste लगेच ओळखतो Accessibility: दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खास साधने भाषांतर: इंग्रजी content मराठी, हिंदीत BYJU's, Unacademy, Vedantu – हे AI कसे वापरतात? BYJU's मध्ये AI बघते की तुम्ही कोणत्या प्रश्नावर किती वेळ...