Posts

Showing posts with the label #काकूनाना # केशरकाकू #बीड परळी रेल्वे

स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्या २० व्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन: बीडच्या रेल्वे क्रांतीच्या 'अमूर्त' शिल्पकार!

Image
विशेष लेख: कचरू चांभारे, बीड (९४२१३८४४३४) काकू, तुमच्या देहाने चिरविश्रांत विसावा घेतला त्या गोष्टीला कालमापनात आज विसावं वर्ष आहे, पण बीडच्या राजकीय पटलावर तुम्ही अजूनही हयात आहात. बारा दिवसांपूर्वीच तर आपली भेट झाली होती. तारांगण गर्दीत मी तुम्हाला दिसलो नसेलच, कारण नभोमंडळाच्या दृष्टीने मी एक अतिशय छोटा जीव; पण तुम्ही मात्र मला दिसलात. तुम्ही दिसलात ती तारीख होती २३ सप्टेंबर. बीडसाठी पुण्याहून पहिली रेल्वे २२ तारखेला मध्यरात्री धावली. या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, "आम्ही नियतीशी नव्या पहाटेचा, प्रगतीच्या सूर्याचा करार केला आहे. जग झोपेत आहे, पण भारतासाठी सकाळचा सूर्य नवी पहाट घेऊन येत आहे." माझे मित्र युवराज खरमाटे सर पहिल्या ट्रेनमध्ये पुणे ते बीड प्रवास करत होते. आम्ही सारखं अपडेट घेत होतो. मध्यरात्रीच्या सुमारास पुण्याहून ट्रेन निघताना मला पंडित नेहरूंचे ते ऐतिहासिक भाषण आठवले. फक्त आज विषय देश स्वातंत्र्याचा नव्हता, तर बीडकरांच्या स्वप्नातील रेल्वेचा होता. नेहरूंच्या जागी तुम्ही होतात व नियतीला सांगत ...