Posts

Showing posts with the label दादेगाव

प्रभुरामचंद्र विद्यालयाच्या सुप्रिया कोकरेचे सुवर्णयश! ३००० मीटर चालणे स्पर्धेत प्रथम क्रमांक; विभागीय क्रीडा स्पर्धेत मारली धडक!

Image
बीड (क्रीडा विशेष): आष्टी तालुक्यातील प्रभुरामचंद्र विद्यालय, दादेगाव येथील विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन करून शाळेच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. काल बीड या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कुमारी सुप्रिया चंद्रकांत कोकरे हिने ३००० मीटर चालणे या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. तसेच, या जिल्हास्तरीय स्पर्धेत विद्यालयातील इतर विद्यार्थिनींनीही चमकदार कामगिरी करत यश मिळवले आहे. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय यश व निवड: कुमारी सुप्रिया चंद्रकांत कोकरे: ३००० मीटर चालणे प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी झालेली निवड. इतर यशस्वी विद्यार्थिनी (द्वितीय क्रमांक विजेत्या): कु. रेश्मा बाळासाहेब लकडे (३००० मीटर चालणे - द्वितीय क्रमांक) कु. समृद्धी संतोष पोटे (१०० मीटर अडथळा शर्यत - द्वितीय क्रमांक) या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या वतीने मनापासून अभिनंदन...

दादेगाव येथे विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या भूमिपुत्रांचा ‘विशेष गुणगौरव सोहळा-२०२६’ उत्साहात संपन्न!

Image
विशेष प्रतिनिधी:   शुक्रवार, दिनांक २ ऑक्टोबर दादेगाव (ता. आष्टी, जि. बीड) येथील श्रीराम मंदिर सभागृहात दादेगाव ग्रामस्थ, कृतीशील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना शाखा आष्टी आणि क्रांतीज्योती सेवाभावी संस्था दादेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दादेगाव परिसरातील गुणवंतांचा व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भूमिपुत्रांचा ‘विशेष गुणगौरव सोहळा-२०२६’ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध माजी प्राध्यापक श्री. मुकुंद काका धनेश्वर यांनी भूषविले. या सोहळ्यात विविध राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त व्यक्ती, गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, नवनियुक्त शिक्षक, तसेच प्रामाणिकपणे मौल्यवान वस्तू परत करणाऱ्या नागरिकांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. महत्त्वाचे सत्कारमूर्ती व पुरस्कार वितरीत झालेले क्षेत्र: राष्ट्रीय / राज्यस्तरीय पुरस्कार: प्राचार्य हरिदास विधाते यांना 'आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचा राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६' तर प्राचार्य शिवदास विधाते यांना 'शिवस्वराज्य राज्यस्तरीय प्रशासन अधिकारी पुरस्कार २०२६' प्रदान ...

क्रीडा वृत्त

Image