Posts

Showing posts with the label कडा

बांधकाम क्षेत्रातील नवे पाऊल: कड्यात 'किनारा ट्रेडर्स'चे भव्य उद्घाटन!

Image
कर्डीले परिवाराकडून आपुलकीचे निमंत्रण कडा (ता. आष्टी, जि. बीड): कडा-टाकळी रोडवर नवीन सुरू होणाऱ्या ‘किनारा ट्रेडर्स’ (बिल्डींग मटेरियल सप्लायर्स अँड होलसेलर्स) या आस्थापनाचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवार, दि. ३१/१०/२०२६ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.   या नवीन दालनात इमारती व शेडसाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य अगदी होलसेल दरात उपलब्ध होणार असून, यात स्टिल, सिमेंट, अँगल, चॅनल, जाळी, तार, हार्डवेअर, पत्रा आदी साहित्याचा समावेश आहे. उद्घाटक व शुभाशीर्वाद: या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून मराठवाडा भूषण, माजी मंत्री तथा विधानसभा सदस्य आ. सुरेश (आण्णा) धस उपस्थित राहणार आहेत तसेच ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल (अध्यक्ष, मदन महाराज संस्थान, कडा) यांच्या शुभ आशीर्वादाने हा सोहळा पार पडणार आहे. प्रमुख उपस्थिती: या प्रसंगी राजकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील खालील प्रमुख मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे:   मा. आ. भीमरावजी धोंडे साहेब, मा. आ. साहेबरावजी (नाना) दरेकर, मा. आ. बाळासाहेब (काका) आजबे, मा. जि.प. सदस्य मा. देविदास (आबा) धस, आष्टी, पाटोदा...