Posts

Showing posts with the label क्रांतीवार्ता

इंजिनिअर सुरज वाघुले यांचा धोंडे कॉलेजमध्ये सत्कार

Image
ग्रामीण भागातून भरारी; सिस्को कंपनीत ४८ लाखांचे वार्षिक पॅकेज कडा (विशेष वृत्त) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर यशाची उत्तुंग शिखरे गाठता येतात, हे आनंदराव धोंडे ज्युनिअर कॉलेजचे माजी विद्यार्थी इंजिनिअर सुरज भगवान वाघुले यांनी सिद्ध केले आहे. बेंगळुरू येथील सिस्को कंपनीमध्ये साइट रिलायबिलिटी इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या सुरज वाघुले यांना ४८ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाल्याबद्दल आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालय, कडा येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. सुरज वाघुले हे आनंदराव धोंडे ज्युनिअर कॉलेजचे शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मधील विद्यार्थी आहेत. त्यांनी बारावी विज्ञान शाखेची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएमच्या जेएनईसी अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. आपल्या गुणवत्तेच्या, मेहनतीच्या आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी नामांकित सिस्को कंपनीत महत्त्वपूर्ण पदावर काम करण्याची संधी मिळवली आहे. त्यांना मिळालेले ४८ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज हे ग्रामीण भागातील विद्...