महारनोर-देवकाते विवाह सोहळा थाटात संपन्न!
कडा (ता. आष्टी, जि. बीड) : आष्टी तालुक्यातील दादेगाव (रामाचे) येथील रहिवासी, सौ. छायाबाई व श्री. तुकाराम रभाजी महारनोर यांचे चिरंजीव 'अजित' आणि सौ. अंजना व श्री. आजिनाथ गहिनीनाथ देवकाते यांची सुकन्या 'चि.सौ.कां. देविता' यांचा विवाह सोहळा काल सोमवार दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ०१:४४ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर कडा येथील महेश मंगल कार्यालय येथे अत्यंत उत्साहात आणि आनंदाच्या पार पडला. या विवाह सोहळ्यादरम्यान पावसाने हजेरी लावून जणू या मंगल प्रसंगावर आपल्या आशीर्वादाचा वर्षाव केला, ज्यामुळे या सोहळ्याची रंगत आणखीनच वाढली. या भव्य विवाह सोहळ्याला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बीड डॉ. शिवाजीराव राऊत, युवा नेते जयदत्त भैय्या धस, माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी महारनोर, दादेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रा. भाऊसाहेब कोकरे, उपसरपंच भरत आप्पा विधाते, दादेगाव सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुरेश आण्णा गर्जे, व्हाईस चेअरमन भुजंग आण्णा विधाते, माजी सरपंच लक्ष्मणरावजी कोकरे, माजी सरपंच बाळासाहेब बंडाले, माजी सरपंच रामदासजी कोल्हे, माजी सरपंच प्रा. सुभाष दादा नागरगोजे, तंटामुक्ती अध्यक्...