महारनोर-देवकाते विवाह सोहळा थाटात संपन्न!
कडा (ता. आष्टी, जि. बीड) :
आष्टी तालुक्यातील दादेगाव (रामाचे) येथील रहिवासी, सौ. छायाबाई व श्री. तुकाराम रभाजी महारनोर यांचे चिरंजीव 'अजित' आणि सौ. अंजना व श्री. आजिनाथ गहिनीनाथ देवकाते यांची सुकन्या 'चि.सौ.कां. देविता' यांचा विवाह सोहळा काल सोमवार दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ०१:४४ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर कडा येथील महेश मंगल कार्यालय येथे अत्यंत उत्साहात आणि आनंदाच्या पार पडला.

या विवाह सोहळ्यादरम्यान पावसाने हजेरी लावून जणू या मंगल प्रसंगावर आपल्या आशीर्वादाचा वर्षाव केला, ज्यामुळे या सोहळ्याची रंगत आणखीनच वाढली.
या भव्य विवाह सोहळ्याला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बीड डॉ. शिवाजीराव राऊत, युवा नेते जयदत्त भैय्या धस, माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी महारनोर, दादेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रा. भाऊसाहेब कोकरे, उपसरपंच भरत आप्पा विधाते, दादेगाव सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुरेश आण्णा गर्जे, व्हाईस चेअरमन भुजंग आण्णा विधाते, माजी सरपंच लक्ष्मणरावजी कोकरे, माजी सरपंच बाळासाहेब बंडाले, माजी सरपंच रामदासजी कोल्हे, माजी सरपंच प्रा. सुभाष दादा नागरगोजे, तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू बाबा निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य किसानरावजी शिंदे, युवा नेते सुरेश खेडकर, जयदत्त मजूर संस्थेचे चेअरमन वसंत (पप्पू) बांदल, कैलासराव पोकळे मुकादम तसेच आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विवाह सोहळ्यास ह.भ.प. जाधव गुरुजी (माजी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बीड), मंदार महाराज रामदासी, ह.भ.प. कारभारी महाराज धस आणि ह.भ.प. दादा महाराज चांगुने, ह.भ.प. योगिता ताई देवकर यांनी उपस्थित राहून नव दाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले.
या विवाह सोहळ्याचे नेटके आणि भारदस्त सूत्रसंचालन श्री. शिवाजीराव कोल्हे सर यांनी अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडले.
विवाह सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी व आलेल्या पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी भाऊसाहेब देवकाते तसेच भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शंभूराज महारनोर समस्त देवकाते आणि महारनोर परिवाराने विशेष परिश्रम घेतले. परिसरातील ग्रामस्थ, नातेवाईक व आप्तेष्ठांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वधू-वरास भावी जीवनासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

Comments
Post a Comment