Posts

Showing posts with the label Marathwada

महाराष्ट्रातील ७५% भागात दुष्काळ जाहीर; २६५ तालुक्यांचा समावेश

Image
मुंबई, २६ सप्टेंबर २०२६: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ जाहीर केला आहे. राज्यात एकूण ३५८ तालुके असून, त्यापैकी २६५ तालुक्यांचा समावेश झाल्याने सुमारे ७५% तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर झाली आहे.   दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने विशेष उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे:    कर व कर्ज सवलती: शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात येणार आहे.    वीजबिलात सवलत: कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट दिली जाणार असून, ५.५ हॉर्सपावरपर्यंतच्या क्षमतेचे वीज पंप अगोदरच माफ करण्यात आले आहेत आणि त्यावरील वीज पंप, तसेच टंचाई जाहीर केलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पपांची वीज जोडणी खंडित न करण्याचे आदेश आहेत. तसेच, आवश्यक त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर केला जाईल. जनावरांसाठी तरतूद: जनावरांसाठी पिण्याच्य...

आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांना प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान

Image
— शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल संपूर्ण बीड जिल्ह्यातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव — कडा (प्रतिनिधी): शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट व दीर्घकाळ सेवा बजावणारे, आष्टी तालुक्यातील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय कडा येथील प्राचार्य डॉ. हरिदासजी विधाते यांना त्यांच्या प्रेरणादायी कार्याची दखल घेत 'आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन'च्या वतीने प्रतिष्ठित 'राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६' ने गौरवण्यात आले आहे.   देशपातळीवर व राज्यपातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. प्राचार्य डॉ. हरिदासजी विधाते यांनी शैक्षणिक क्षेत्रात घेतलेली मेहनत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान आणि सामाजिक उपक्रमांमध्ये घेतलेला सक्रिय सहभाग यामुळे त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.    हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला असून, यावेळी त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पदक प्रदान करून गौरवण्यात आले. त्यांच्या या यशाने केवळ आष्टी तालुकाच नव्हे, तर संपूर्ण बीड जिल्ह्याची मान ...

बीड व आष्टी तालुक्यासाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय; नेकनूर व कडा येथे अप्पर तहसीलदार कार्यालये कार्यान्वित करण्यास शासनाची मान्यता

Image
कडा (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचा महसुली कामांसाठी होणारा त्रास आणि वारी वाचवण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, बीड तालुक्यातील नेकनूर आणि आष्टी तालुक्यातील कडा येथे नवीन अप्पर तहसीलदार कार्यालये कार्यान्वित करण्यास अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयातील कामकाजाचा वाढता व्याप, भौगोलिक विस्तार आणि नागरिकांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रशासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे बीड व आष्टी तालुक्यातील नागरिकांना दाखले, प्रमाणपत्रे, जमिनीचे फेरफार यांसारख्या विविध महसुली सेवा आता स्थानिक पातळीवरच अगदी सहज आणि जलद उपलब्ध होणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे नेकनूर व कडा परिसरातील नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांमधून तीव्र समाधान व्यक्त होत असून, अनेक दिवसांची त्यांची मागणी पूर्ण झाली आहे. लवकरच ही नवीन कार्यालये प्रत्यक्ष सुरू होऊन कारभार सुरू होण्याची शक्यता आहे.

​मराठवाड्यात दुष्काळी संकट गडद; बीड जिल्ह्यातील ९० टक्के तलाव कोरडेठाक पडल्याने मत्स्य व्यवसायही धोक्यात

Image
बीड (प्रतिनिधी) : मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे संपूर्ण विभागात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत तब्बल ६० टक्के पाऊस कमी झाला आहे. तर १ जूनपासूनच्या एकूण पावसाचा विचार केला असता, ३२ टक्क्यांची मोठी तूट नोंदवली गेली आहे. यामुळे हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम पूर्णपणे वाया जाण्याच्या मार्गावर असून, बळीराजाचे अर्थकारण कोलमडले आहे. या भीषण दुष्काळाच्या झळा आता बीड जिल्ह्यालाही तीव्रतेने बसू लागल्या आहेत. अपुऱ्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील जवळपास ९० टक्के लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असतानाच, आता शेतीसोबतच जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय आणि मत्स्यबीज उत्पादनासमोरही मोठे संकट उभे ठाकले आहे. प्रकल्पांमधील पाणी झपाट्याने आटल्यामुळे मत्स्य व्यावसायिक आणि शेतकरी हवालदिल झाले आहेत. परिस्थितीची गंभीरता पाहता, शासनाने तातडीने मराठवाड्यात ओला/सुका दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी तातडीने आर्थिक मदत व रब्बी हंगामासाठी विशेष ...