Posts

Showing posts with the label दसरा महामेळावा

गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथे ११ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र महोत्सव व शिव महापुराण कथेचे आयोजन

Image
श्री सुभान संतुआई देवी जागृत देवस्थानचा १९ वा धार्मिक महोत्सव; २० ऑक्टोबरला दसरा महामेळावा व महाप्रसाद गेवराई (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील श्री सुभान संतुआई देवी जागृत देवस्थानच्या वतीने यंदा १९ व्या वर्षी शारदीय नवरात्र महोत्सव व शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ११ ऑक्टोबरपासून या धार्मिक महोत्सवाला प्रारंभ होणार असून, मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर दसरा मेळावा, सीमोल्लंघन व महाप्रसादाने महोत्सवाची सांगता होणार आहे. या काळात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, हरिपाठ, सप्तशती पाठ, आरती आणि हरिजागराचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी तसेच शिव महापुराण कथेचे श्रवण करण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, सिरसमार्ग व पंचक्रोशी परिसराच्या वतीने करण्यात आले आहे. दररोज धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल महोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होईल. दररोज पहाटे ४ ते ६ या वेळेत काकडा भजन, सकाळी ६ वाजता आरती, सका...