Posts

Showing posts with the label पोषण माह २०२६

पोषण माह २०२६ अंतर्गत दादेगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन; तहसीलदार सौ. वैशाली पाटील यांची सदिच्छा भेट

Image
दादेगाव (आष्टी): महिला व बालविकास विभाग, एकात्मिक बाल विकास प्रकल्प (I.C.D.S.) आष्टी अंतर्गत 'पोषण माह २०२६' चा उपक्रम ९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत उत्साहात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दादेगाव येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या पुढाकाराने विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमास तहसीलदार सौ. वैशाली पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी कार्यक्रमाची पाहणी केली आणि तेथे साकारण्यात आलेल्या विविध आकर्षक पाक कलाकृतींचा व उपक्रमांचा मनसोक्त आस्वाद घेतला. तसेच उपस्थित महिला, पालक व बालकांशी संवाद साधून संतुलित आहाराचे महत्त्व विषद केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रकल्प अधिकारी सौ. बेल्हेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, या प्रसंगी पर्यवेक्षिका सौ. वाघमारे मॅडम, सौ. व्यवहारे मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून शितल यादव यांनी जबाबदारी सांभाळली. परिसरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. दादेगावसह कोकरेवाडी, शंकरनगर, कर्डिले वस्ती, कोल्...