श्री पांडुरंग विद्यालय, नांदूरच्या खेळाडूंची विभागीय क्रीडा स्पर्धेत धडक! जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ३ खेळाडूंचे घवघवीत यश; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
बीड (क्रीडा विशेष) जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत श्री पांडुरंग विद्यालय, नांदूर येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. विद्यालयातील तीन खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत यशाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे विधाते जयदीप भीमराव या विद्यार्थ्याने दोन वेगवेगळ्या स्पर्धा प्रकारांत विजय मिळवत विभागीय स्तरावर धडक मारली आहे. यशस्वी खेळाडू, क्रीडा प्रकार व मिळवलेले क्रमांक: १) विधाते जान्हवी सखाराम: २०० मीटर धावणे – प्रथम क्रमांक २) विधाते जयदीप भीमराव: (२ स्पर्धांमध्ये यश): लांब उडी – द्वितीय क्रमांक, १०० मीटर धावणे – तृतीय क्रमांक ३) शिंदे अवधूत सुनील: ४०० मीटर धावणे – द्वितीय क्रमांक विद्यार्थ्यांची जिद्द, मेहनत, चिकाटी आणि शिक्षकांचे मार्गदर्शन याच्या जोरावरच हे यश साध्य झाले आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंचे, त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून पुढील विभागीय स्पर्धेसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या ...