पीएम किसान योजनेचे पैसे खात्यात जमा; तुमचे पैसे आले की नाही घरबसल्या असे तपासा!
शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना बँकेचे मेसेज देखील आले आहेत. तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळाला आहे की नाही आणि तुमच्या बँक खात्यात ₹२,००० जमा झाले आहेत का, हे तुम्ही खाली दिलेल्या अधिकृत लिंक्सचा वापर करून अगदी २ मिनिटांत तपासू शकता. 📌 तुमच्या खात्यात पैसे आले की नाही 'असे' तपासा: खाली दिलेल्या अधिकृत लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचे स्टेटस पाहू शकता: ➡️ https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus_New.aspx 💰 बँक बॅलन्स तपासण्याचे इतर सोपे पर्याय: जर तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर स्टेटस पाहायला अडचण येत असेल, तर तुम्ही खालील पद्धतींनी खात्यात पैसे पडले की नाही हे पाहू शकता: • बँकेचा SMS: तुमच्या बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर बँकेकडून आलेला जमा (Credit) रकमेचा मेसेज तपासा. • मोबाईल बँकिंग ॲप: तुमच्या बँकेच्या अधिकृत ॲप (उदा. YONO SBI, IPPB Mobile Banking, Baroda M-Connect) मध्ये लॉग इन करून खात्यातील शिल्लक शिल्लक (Balance) तपासा. • पासबुक किंवा ATM: त...