Posts

Showing posts with the label आष्टी वृत्त

आष्टी तालुक्यासाठी ऐतिहासिक क्षण! अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 'महेश सहकारी साखर कारखाना' पुन्हा धगधगणार; 'या' दिवशी होणार बॉयलर अग्निप्रदिपन!

Image
कडा / आष्टी: आष्टी आणि कडा परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर कडा येथील 'महेश सहकारी साखर कारखाना लि.' पुन्हा एकदा सुरू होत आहे. कारखान्याचा सन २०२६-२७ चा गळीत हंगाम लवकरच सुरू होणार असून, त्यानिमित्ताने बॉयलर अग्निप्रदिपन शुभारंभ सोहळ्याचे जंगी आयोजन करण्यात आले आहे. हा साखर कारखाना अनेक वर्षांपासून बंद असल्याने स्थानिक शेतकरी, कामगार आणि व्यापारी वर्गात मोठी चिंता होती. ऊस असूनही कारखाना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागत होता. मात्र, आता कारखान्याचे चेअरमन युवा नेते डॉ. अजय दादा धोंडे आणि व्हाईस चेअरमन श्री. दादासाहेब जगताप यांच्या खंबीर नेतृत्वाखाली व सर्व संचालक मंडळाच्या अथक प्रयत्नांमुळे हा कारखाना नव्या जोमाने सुरू होत आहे. यामुळे संपूर्ण आष्टी तालुक्याच्या अर्थकारणाला मोठी गती मिळणार आहे. दिग्गज महाराजांच्या हस्ते होणार शुभारंभ: कारखान्याच्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेनुसार, हा भव्य सोहळा सोमवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:१५ वाजता क...