आष्टी तालुक्यासाठी ऐतिहासिक क्षण! अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 'महेश सहकारी साखर कारखाना' पुन्हा धगधगणार; 'या' दिवशी होणार बॉयलर अग्निप्रदिपन!

कडा / आष्टी:
आष्टी आणि कडा परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर कडा येथील 'महेश सहकारी साखर कारखाना लि.' पुन्हा एकदा सुरू होत आहे. कारखान्याचा सन २०२६-२७ चा गळीत हंगाम लवकरच सुरू होणार असून, त्यानिमित्ताने बॉयलर अग्निप्रदिपन शुभारंभ सोहळ्याचे जंगी आयोजन करण्यात आले आहे.

हा साखर कारखाना अनेक वर्षांपासून बंद असल्याने स्थानिक शेतकरी, कामगार आणि व्यापारी वर्गात मोठी चिंता होती. ऊस असूनही कारखाना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागत होता. मात्र, आता कारखान्याचे चेअरमन युवा नेते डॉ. अजय दादा धोंडे आणि व्हाईस चेअरमन श्री. दादासाहेब जगताप यांच्या खंबीर नेतृत्वाखाली व सर्व संचालक मंडळाच्या अथक प्रयत्नांमुळे हा कारखाना नव्या जोमाने सुरू होत आहे. यामुळे संपूर्ण आष्टी तालुक्याच्या अर्थकारणाला मोठी गती मिळणार आहे.

दिग्गज महाराजांच्या हस्ते होणार शुभारंभ:
कारखान्याच्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेनुसार, हा भव्य सोहळा सोमवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:१५ वाजता कारखाना स्थळावर संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे बॉयलर अग्निप्रदिपन महाराष्ट्रातील नामांकित संतांच्या आणि महाराजांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. यामध्ये:

• ह.भ.प. विठ्ठल महाराज गहिनीनाथ गड

• ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज

• ह.भ.प. रामकृष्ण रंधवे बापू महाराज

• ह.भ.प. बबन महाराज बहीरवाल

• ह.भ.प. अशोक महाराज भोसले

या सर्व थोर संतांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला आध्यात्मिक आणि कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाले आहे.

माजी आमदार भीमरावजी धोंडे करणार अध्यक्षपद भूषवणार:

या ऐतिहासिक कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाराष्ट्र भूषण माजी आमदार मा. भीमरावजी धोंडे साहेब भूषवणार आहेत. कारखान्याचे चेअरमन डॉ. अजय दादा धोंडे, व्हाईस चेअरमन श्री. दादासाहेब जगताप, कार्यकारी संचालक आणि सर्व संचालक मंडळासह सर्व कर्मचारी व कामगार बंधूंनी या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली आहे.

अनेक वर्षांनंतर कारखान्याची चिमणी पुन्हा धूर ओकणार असल्याने आष्टी-कडा भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



स्थानिक पातळीवरील अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी 'क्रांतीवार्ता' (krantivarta.in) न्यूज पोर्टलला भेट देत राहा.

Comments

Popular posts from this blog

तुमचे शिक्षक व पदवीधर मतदार संघ मतदार यादी 2026 मधील नाव शोधा.

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत असे करा मतदान!

शिक्षक गुणवत्तेसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय: शिक्षकांसाठी दरवर्षी ५० तासांचे CPD प्रशिक्षण अनिवार्य