आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांना प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान
— शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल संपूर्ण बीड जिल्ह्यातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव —
कडा (प्रतिनिधी):
शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट व दीर्घकाळ सेवा बजावणारे, आष्टी तालुक्यातील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय कडा येथील प्राचार्य डॉ. हरिदासजी विधाते यांना त्यांच्या प्रेरणादायी कार्याची दखल घेत 'आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन'च्या वतीने प्रतिष्ठित 'राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६' ने गौरवण्यात आले आहे.
देशपातळीवर व राज्यपातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. प्राचार्य डॉ. हरिदासजी विधाते यांनी शैक्षणिक क्षेत्रात घेतलेली मेहनत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान आणि सामाजिक उपक्रमांमध्ये घेतलेला सक्रिय सहभाग यामुळे त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला असून, यावेळी त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पदक प्रदान करून गौरवण्यात आले. त्यांच्या या यशाने केवळ आष्टी तालुकाच नव्हे, तर संपूर्ण बीड जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांना 'राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६' जाहीर झाल्याबद्दल आणि तो प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक मा. आमदार ॲड. भीमरावजी धोंडे साहेब, महेश सहकारी साखर कारखाना कड्याचे चेअरमन डॉ. अजय दादा धोंडे, श्री. अभयराजे धोंडे, सर्व प्रशासन मंडळ शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी, विविध शैक्षणिक संस्थांच्या वतीने, मित्रपरिवाराकडून तसेच संपूर्ण बीड जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment