१२ दिवसांच्या अखंड भक्तीनंतर लाडक्या गणरायाच विसर्जन; गुलालाची उधळण करत बाप्पाला निरोप!


क्रांतीवार्ता विशेष:
यंदाचा गणेशोत्सव विशेष ठरला कारण लाडक्या बाप्पाला तब्बल १२ दिवस आपली सेवा करण्याची संधी भाविकांना मिळाली. १२ दिवसांच्या या दिमाखदार आणि भक्तीमय सोहळ्याची सांगता अत्यंत उत्साहात पार पडली. गावागावांपासून शहरांपर्यंत सर्वत्र ढोल-ताशांचा गजर, वाजत-गाजत आणि गुलालाची उधळण करत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.

'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असा आसमंत दुमदुमणारा जयघोष करत हजारो भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायाला साश्रू नयनांनी निरोप दिला. विसर्जन मिरवणुकीदरम्यान तरुणांनी आणि महिलांनी गुलालाची उधळण करत ठेका धरला होता. तब्बल १२ दिवस मुक्काम केल्यामुळे बाप्पाच्या निरोपाचा हा क्षण प्रत्येकाचे मन हेलावणारा आणि तितकाच भावनिक होता. विसर्जनस्थळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बाप्पाच्या पाठवणीने घराघरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये काहीशी पोकळी निर्माण झाली असली, तरी 'पुढच्या वर्षी लवकर या' या अपेक्षेने सर्वांच्या चेहऱ्यावर बाप्पाच्या आगमनाची आस स्पष्ट दिसत होती.

Comments

Popular posts from this blog

तुमचे शिक्षक व पदवीधर मतदार संघ मतदार यादी 2026 मधील नाव शोधा.

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत असे करा मतदान!

शिक्षक गुणवत्तेसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय: शिक्षकांसाठी दरवर्षी ५० तासांचे CPD प्रशिक्षण अनिवार्य