मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ गेवराईत माजी आमदार अमरसिंह पंडित यांचा पदवीधरांशी संवाद
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री. सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज गेवराई येथे पदवीधर मतदारांशी माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी संवाद साधला. यावेळी उपस्थितांशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करत, श्री. सतीश चव्हाण यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करण्याचे आवाहन अमरसिंह पंडित यांनी केले.
यावेळी बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, मागील तीन कार्यकाळात पदवीधरांचे नेतृत्व करताना सतीशभाऊंनी मराठवाड्याच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे नॅशनल लॉ स्कूल मंजूर होण्यासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा असो किंवा गेवराईसारख्या भागातील मुलींच्या उच्च शिक्षणासाठी केलेले सहकार्य असो, त्यांच्या कामाची ठोस उदाहरणे आपल्या समोर आहेत.
आज सोशल मीडियावर ‘सतीश चव्हाण यांनी काय केले?’ असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना त्यांच्या या कामातूनच स्पष्ट उत्तर मिळते. पदवीधर, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे, असेही पंडित म्हणाले.
यावेळी गेवराई परिसरातील पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment