कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी दिव्या फिस्के ४०० व ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तालुक्यात प्रथम
धानोरा (प्रतिनिधी): कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची इयत्ता बारावी (कॉमर्स) ची होतकरू विद्यार्थिनी दिव्या सुनील फिस्के हिने क्रीडा क्षेत्रात आपल्या महाविद्यालय व तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. १७ वर्ष वयोगटातून ४०० मीटर आणि ८०० मीटर रनिंग स्पर्धेत तिने घवघवीत यश संपादन करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या चोख कामगिरीमुळे तिची आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये अपार प्रतिभा असते, हे दिव्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अत्यंत चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर तिने दोन्ही स्पर्धांमध्ये उत्कृष्ट धावपटू म्हणून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. तिच्या या यशाने धानोरा तालुक्यात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दिव्या फिस्के हिच्या या यशामागे तिचे क्रीडा शिक्षक, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि कुटुंबीयांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वृंद, सहकारी विद्यार्थीनी आणि ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले असून, आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेत ती तालुक्याचा झेंडा आणखी उंच फडकवेल, असा विश्वास व्यक्त करत तिला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment